You are currently viewing Wrong priorities – Paying cost of ignoring research

Wrong priorities – Paying cost of ignoring research

Title – Wrong priorities – Paying cost of ignoring research
From Facebook, Wall of Nitin kakad.
Author – not known.

जगभरातील कोरोना व्हायरसमुळे होणारे अगणिक मृत्यू ऐकून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे
” *औषध संशोधनाकडे होणारे दुर्लक्ष सगळ्या जगाला महागात पडले”.*

 

👉अमेरिकेतील नामांकित Virology संस्थेच्या प्रमुखाचा TV interview चालू होता ज्या वेळी त्याना प्रश्न विचारण्यात आला कि, काही महिने झाले करोना व्हायरस येऊन अजून का औषध किंवा लस का निघाली नाही? त्यांनी हसत उत्तर दिले तुम्ही आठवून बघा, एखाद्या Research Scientist चा शेवटचा interview तुम्ही कधी घेतला (उत्तर:कधीच नाही). तुमचे लाडके राजकारणी, खेळाडू, सेलेब्रिटी घरात बसलेत त्यांची तुम्हाला फार काळजी आहे, त्यांच्या घरात बसण्यामुळे तुमचा धंदा कमी झालाय. आम्ही आमच्या प्रोटोकॉलप्रमाणे आमचे काम करणार. एका रात्रीत काही चमत्कार होणार नाही.
👉 ह्याच Scientist ने TV interviewer ला एक प्रतिप्रश्न केला, ‘एलिस ग्रॅनॅटो’ ही व्यक्ती कोण आहे? आणि TV interviewer बराच विचार करून उत्तर आले नाही. कदाचित आपल्यापैकी ही कोणाला माहीत नसेल.
👉’ *एलिस ग्रॅनॅटो* ‘ ही कोरोना व्हायरसची संशोधित लस टोचून घेणारी जगतातील पहिली महिला कोणी ग्लॅमर असणारी सेलिब्रिटी, खेळाडू किंवा राजकारणी नसून ऑक्सफर्ड विद्यापीठात Microbiolgy या मूलभूत विषयात संशोधन करणारी ३० वर्षीय Scientist आहे.
👉स्पॅनिश संशोधकाला असाच प्रश्न विचारण्यात आला. उत्तर विचार करायला लावणारे होते ‘तुम्ही खेळाडू किंवा सेलिब्रिटी ह्यांना एका दिवसासाठी/रात्रीसाठी करोडो मध्ये पैसे देता आणि महिन्याला काही हजार मिळवणाऱ्या संशोधकांना तुम्ही हा प्रश्न विचारताय कि करोना व्हायरस वर एका रात्रीत औषध/लस का काढत नाही?
👉 ऑस्कर, आयफा, फिल्मफेअर यासारख्या अवॉर्ड फंक्शन किंवा र्ऑलिंपिक, फुटबॉल/टेनिस/क्रिकेट/कार रेसिंग वर्ल्ड कप/बॉक्सिंग यासारख्या क्रीडा स्पर्धावर करोडो रुपये उधळले जातात, पण औषध संशोधन किंवा आरोग्य व्यवस्था मजबुतीकरण ह्यावर खर्च करण्यासाठी काही लाखांची तजवीज केली जाते आणि तीही फक्त सरकारकडून. इतर कोणीही पुढाकार किंवा sponsorship घेत नाही. दुर्दैवाने, मीडिया या गोष्टींकडे ढुंकूनही लक्ष देत नाही. त्याऐवजी प्रियांका-निक, विराट-अनुष्का ह्यांचे लग्न सोहळे ह्यावर कित्येक दिवस बातम्या येतात.
👉एका नॅशनल TV चॅनेल ने ‘अदनान सामी’, तर दुसऱ्याने ‘कपिल देव’ ला Covid19 चा एक्स्पर्ट म्ह्णून चर्चेसाठी बोलावलं होते. दिवसभर त्यांचे कौतुक सांगत होते.अशा देशात Covid19 चे औषध/लस तयार कशी होईल?
👉 इलेक्ट्रॉनिक मीडियावरची ब्रेन हॅमेरिंग बघून हल्ली आपल्याकडेही आपल्या मुलांना ऍक्टर, डान्सर, सिंगर, खेळाडू बनवण्याचा कल वाढत चालला आहे. कारण ह्यासाठी पैसे छापणारे coaching classes जागोजाग उघडलेत. आपल्यालाही असे वाटते की खेळाडू किंवा सेलिब्रिटी ह्यांना समाजात मान/पान/स्थान आहे. Post Graduation/PhD करणे म्हणजे करिअर/ वेळ वाया घालवणे हि मानसिकता फक्त समाजाची नसून शिकवणाऱ्या प्राध्यापकांची पण आहे.
👉 पण वास्तव हे आहे कि, आपल्या आजूबाजूला कितीतरी संशोधक अगदी शांतपणे कोणतीही प्रसिद्धी न करता वेगवेगळ्या विषयावर संशोधन करतायत, आपले त्यांच्याकडे लक्षच नसते कधी. मीडिया त्यांना किंमत देत नाही,कारण त्यांच्यात ग्लॅमर नसते.
👉भारतात व्हायरस वर संशोधन करणारी एकमेव सरकारी रिसर्च संस्था पुण्यामध्ये आहे- NIV. आपल्यातील 80% लोकांना हे माहित सुद्धा नसेल. जगातील फक्त 12 देशामध्ये खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट मध्ये आपला नंबर 1 ने वर/खाली झाला तर सगळ्या देशात तमाशा सुरु होतो, पण १९५ देशामध्ये संशोधनात आमचा किती नंबर आहे याचे आपल्याला काहीच नसते. ज्या रामानुजन यांचे आपण अभिमानाने नाव घेतो, त्यांच्यावर हॉलीवूड ने सिनेमा काढला बॉलीवूडने नाही.
👉 मागील काही वर्षात मानवाने Roads, Railways, Airports ह्यासारख्या Infrastructure, IT/Robotics, Atomics, Aronotics, Space Research ह्यासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली, पण अनाहूतपणे 2005 पासून जगातील 50% पेक्षा अधिक मूलभूत विषयात संशोधन करणाऱ्या संस्था बंद झाल्यात ज्यामध्ये काही नवीन औषध/लस शोधत होत्या आणि हेच आज सगळ्या जगाला महागात पडले.
👉कदाचित काही दिवसात करोना व्हायरस वर औषध/लस तयार होईल, लोक संशोधकांना विसरून पण जातील, पण इतिहास सांगतोय आज जर आपण मूलभूत संशोधनाकडे असेच दुर्लक्ष केले तर याच्या पेक्षा ताकतवान व्हायरस/बॅक्टरीया भविष्यात येतील.
👉 औषधीसंशोधन आणि आरोग्यव्यवस्था बळकटी करणासाठी महामारीची वाट बघणे म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदणे होय.
त्यामुळे येत्या काळात B.Pharm, M. Pharm, PhD Pharmaceutical sciences , MSc,Microbiologist, Bitechnologist यांना योग्य सन्मान शासन व समाज यांकङून मिळो ही अपेक्षा 😊
लेखक:माहिती नाही

Leave a Reply

seventeen + twenty =