You are currently viewing Coronavirus : तरुण डॉक्टरांच्या समूहाने एकत्र येऊन देशभरात केलेल्या कामाचा हा आंखो देखा हाल

Coronavirus : तरुण डॉक्टरांच्या समूहाने एकत्र येऊन देशभरात केलेल्या कामाचा हा आंखो देखा हाल

कोरोनाशी युद्ध सोपं नाही, गावपातळीवर तर अजिबात नाही. पण मग करायचं काय, असा प्रश्न होताच. काहीतरी करायला तर हवंच होतं. आम्ही नुसते बघ्याची भूमिका घेणार की आपल्या सर्व शक्तिनिशी या लढाईच्या मैदानात उतरणार? जमेल ती मदत करणार की, हातावर हात धरून बसणार? हे प्रश्न होतेच. प्रत्येकाने आपलं उत्तर ठरवलं.

coronavirus : तरुण डॉक्टरांच्या समूहाने एकत्र येऊन देशभरात केलेल्या कामाचा हा आंखो देखा हाल

ठळक मुद्दे:-
सर्व स्वयंसेवक स्वत:चं काम, दवाखाना, व्यवसाय, अभ्यास, सांभाळून आपलं समजून हे काम करत आहेत. – डॉ. प्रियदर्श

कोरोनाच्या बातम्या नुकत्याच कानावर पडायला सुरुवात झाली होती. होळीच्या दरम्यान मित्रच्या लग्नाला गोंदियाहून थेट कोल्हापूर गाठलं होतं. महाराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास केल्याने तब्बल चोवीस तास पूर्ण महाराष्ट्र अनुभवत होतो. सामाजिक वैद्यकशास्नचा पदव्युत्तर अभ्यासक्र म नुकताच संपला होता आणि तेव्हापासून थोडं निरीक्षण करण्याची सवय लागली होती. घटना, त्यामागची कारणं, आजार पसरण्याचे मार्ग आणि मग त्यावरच्या उपाययोजना याची मनात आखणी सुरू होत होती. बाहेर जगात कोरोनाने गोंधळ घातला होता. भारतातही काही केसेस दिसू लागल्या. पण असं वाटत होतं की सार्स, निपाह, स्वाइन फ्लू, हे आजार जसे भारतात फार काही करू शकले नाहीत, तसेच याचंपण होईल. परंतु आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे लक्ष असल्यामुळे या आजाराबद्दल माहिती सतत घेत होतो. ट्रेनमध्ये भीतीसुद्धा वाटत होती की एखादा कोरोनाबाधित रु ग्ण आपल्या बाजूला बसल्यावर आपण काय करावं. कसं ओळखावं. पण संपूर्ण महाराष्ट्र निवांत होता, कुणीच फारशी कोरोनाची दखल घेतलेली दिसत नव्हती. सर्व एकमेकांना खेटून बसले होते. नाकाला फडकं कुणीच बांधलं नव्हतं. गर्दी कुठेही कमी झाली नव्हती. प्रवाशांशी याबद्दल चर्चा केली तर त्यांनाही काही माहीत नव्हतं . मित्नाला विचारलंसुद्धा की या वातावरणात लग्न आणि गर्दी धोकादायक आहे. परंतु तिथंही फारसं गांभीर्य नव्हतं. अगदी एक राज्यमंत्नी येऊन त्या लग्नाला हजेरी लावून गेले.

परत येताना मिरजेत माङया जुन्या मेडिकल कॉलेजला भेट देऊन आलो. तिथेही परिस्थिती सामान्य होती. एव्हाना अनेक मेडिकल कॉलेजमध्ये विद्याथ्र्याना सुटय़ा लागल्या. गंभीर होतेय परिस्थिती याचा अंदाज येतच होता. आमच्या मेडिको फ्रेण्ड सर्कल आणि स्वदेस ग्रुपवर एव्हाना बरीच शास्रीय माहिती मिळू लागली. कोल्हापूरहून सेवाग्रामला घरी जाऊन शहीद हॉस्पिटल, छत्तीसगढमध्ये परत आलो. गाव भेटीला जाणं सुरू होतं. गावातच काही क्लस्टर क्लिनिक आम्ही सुरू केले होते. तेथील काम सुरळीत सुरू होतं. लोकांना विचारायला सुरु वात केली की कोरोनाविषयी काय माहिती आहे. इथेसुद्धा लोक निवांत होते. पारावर गर्दी तशीच होती. एप्रिल/मे महिन्यामध्ये लग्नसराई. अनेकांकडे लगAाची तयारी सुरूहोती. गावक:यांना कोरोनाबद्दल फक्त एवढीच माहिती मिळाली होती, की ही ‘मुर्गा बिमारी’ आहे. कोंबडय़ांद्वारे ती पसरते, त्यामुळे काही दिवस कोंबडय़ा खाणार नाही असं ते म्हणत होते. बाकी काही माहिती नव्हतं.

दली राजहारा या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी छोटय़ा टप:यांवर जाऊन बसू लागलो. विशेषत: हॉटेल, चाट भंडार, सामोस्याच्या आणि चहाच्या टप:या. रोज संध्याकाळी वेगळ्या टपरीवर जायचे. अर्धा तास बसून लोकांच्या आपापसातल्या गप्पा ऐकायच्या. लोकांच्या गप्पातून कळत की आता बोलण्यात मुख्य मुद्दे या बिमारीबद्दलच होते. आणि त्यात भयानक गैरसमज होते. दारू पिऊन ही बिमारी नष्ट होते. सिगारेट. गांज्याच्या धुव्याने घशातील जंतू मरतील, कोंबडी खाऊ नका, चीनने खोटी अफवाह पसरवली आहे, थाळी वाजवल्याने जंतू मरतील, या आजाराने सर्व मरणारच आहे मग कशाला घाबरता? घरी धुनी धूप केल्याने रोग पळून जाईल, गरम पाणी प्या – चहा प्या आणि रोग होणार नाही, आलं खाल्ल्याने रोग नष्ट होतो, इत्यादी नाना प्रकारची चुकीची माहिती, फेक माहिती या लोकांर्पयत पोहचली होती.

मग आम्ही क्लिनिकच्या गावात जाऊन लोकांना सांगायला सुरु वात केली की एक मीटर अंतर राखा. एकमेकांना हात लावू नका, हात धूत राहा. पण प्रश्न होता, की गावात हे कसं शक्य आहे? त्यासाठी तिथल्याच लोकांना विचारलं की काय केलं तर आपल्याला हे करता येईल. ब:याच लोकांनी हात धुण्याबद्दलच्या युक्त्या सांगितल्या. पण काही ना काही त्रुटी प्रत्येकात होत्या. म्हणजे हात धुणो, लांब राहणो, हेसुद्धा इथं सोपं नाही, नव्हतं. गाव पातळीवर तर अजिबात नाही. पण मग करायचं काय, असा प्रश्न होताच. काहीतरी करायला तर हवंच होतं. प्रश्न हा होता की आम्ही नुसते बघ्याची भूमिका घेणार की आपल्या सर्व शक्तिनिशी या लढाईच्या मैदानात उतरणार? जमेल ती मदत करणार की हातावर हात धरून बसणार? प्रत्येकाने आपलं उत्तर ठरवलं होतं. आम्हीपण ठरवलं. अनेक मित्रंना फोन केले. त्यांच्या ठिकाणची माहिती करून घेतली. मग ठरवली की आपल्याला काय काय करतो येईल? जे ठरवलं, त्यातलं जे करता येईल अशा गोष्टी आम्ही निवडल्या.

1) एकीकडे वैद्यकीय क्षेत्नात काम करणा:यांमध्येच कोरोनाबद्दल संपूर्ण माहितीद्वारे आलेली जागरूकता निर्माण करणं. सामान्य लोकांमध्ये पसरलेल्या अफवा व चुकीच्या माहिती हे पाहता त्यांच्यार्पयत योग्य आणि शास्रीय माहिती पोहचवणं.
2) त्यापैकी बरीच माहिती इंग्रजीमध्येच उपलब्ध होती. ती स्थानिक भाषेत आणणं आवश्यक होतं.
3) अनेक कॉलेज, ऑफिस यांना सुट्टय़ा असल्यामुळे प्रचंड मोठा वर्ग घरीच बसून आहे.

चुकीच्या माहितीचा बळी ठरत आहे तर त्यांच्यार्पयत योग्य माहिती पोहचवणं. हे तीन मुख्य मुद्दे ठरवून आम्ही 19 मार्च रोजी युमेत्ता फाउण्डेशनतर्फे 15 डेज फॉर नेशन या नावानं मोहीम काढली. त्या अंतर्गत अनुवाद, व्हिडीओ, पोस्टर तयार करण्याचं तंत्न अवगत असणा:या विविध भाषांमधील इच्छुक तरु णांना या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं. अर्ज केलेल्या व्यक्तींना विविध गटांमध्ये विभागण्यात आलं. काही तरु ण वेबसाइट्सवरून शास्रीय माहिती गोळा करण्याचे काम करू लागले. एक गट अनुवादकांचा केला तर काही तरु णांवर अनुवादित माहिती पोस्टर्स आणि व्हिडीओच्या स्वरूपात तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. दर दिवशी कोरोनाबद्दलचा एक विशिष्ट विषय निश्चित करून दिवसाच्या शेवटी तो विषय सर्व भाषांमध्ये अनुवादित होऊन त्याचे पोस्टर्स तयार करायची असं ठरलं. तयार झालेलं साहित्य नीट बारकाइनं तपासून स्वत: डॉक्टरमार्फत किंवा संस्थांमार्फत गरजेनुसार विविध ठिकाणी पाठवायला सुरुवात झाली. या कामात देशभरातून 4क्क्हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले. 3क्क्हून अधिक पोस्टर्स, विविध प्रकारचं प्रचार साहित्य आणि व्हिडीओ तयार करून ते
संकेतस्थळावर टाकण्यात आला. अजूनही हे काम सुरूच आहे. वेगवेगळ्या राज्यांच्या आरोग्य मंत्नालयाद्वारे प्रसारित करण्यात आलेलं आरोग्य शिक्षणाचं साहित्यही त्या त्या राज्यांच्या भाषेमध्ये एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. डोक्यात एकच गोष्ट पक्की होती की, कोरोनाविषयी जनजागृती करायची. जास्तीत जास्त लोकांर्पयत शास्रीय माहिती पोहचवायची. भारतभरातील डॉक्टर्स, स्वयंसेवक आणि वैद्यकशाखेशी संबंधित असणारे तरुण या कामात एकत्र आले. त्यांनी युमेत्ता फाउण्डेशन या तरु णांनी तरु णांसाठी स्थापन केलेल्या संस्थेच्या मदतीने काम सुरू केलं असून, त्या अंतर्गत जागतिक आरोग्य संघटना, आरोग्य मंत्नालय भारत, यासारख्या वैद्यकीय क्षेत्नातील अग्रगण्य संस्थांनी तयार केलेल्या आरोग्य शिक्षणाच्या साहित्याचं एकूण बारा भारतीय भाषांमध्ये भाषांतर केलं आणि ते आपल्या संकेतस्थळवर उपलब्ध करून दिलं.

कोरोनाचा प्रसार कसा होतो, तो टाळण्यासाठी काय केले पाहिजे, शास्रीयदृष्टय़ा हात धुण्याचे तंत्न, विलगीकरणाचे महत्त्व, मानसिक विकार असणा:या, दारूचं व्यसन असणा:या व्यक्तींना सल्ला, स्तनपानादरम्यान घ्यायची काळजी, लोकडाउनमध्ये मुलांवर /महिलांवरील अत्याचार वाढ , मदत करणा:या विविध राज्य पुरस्कृत हेल्पलाइन, अशी सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध केली आहे. इंग्लिश, आसामी, बंगाली, गुजराथी, हिंदी, कन्नड, मराठी, मल्याळम, उडिया, तमिळ, उर्दू, तेलुगू या बारा भाषांमध्ये वाचणं शक्य आहे. तसेच कोरकू, गोंडी, संथाली व इतर आदिवासी बोलीभाषेतही या माहितीचं भाषांतर सुरू झाले आहे. सिंधुनीला, राजीव, अनुषा, मनवीन, चारु ता, गौरी, चेतना, श्रुती, समर, भार्गव, ओंकार, ओजस, सुमेध, सुप्रभा, लक्ष्मी, इत्यादी अनेक लोक यामध्ये मदत करत आहेत. मिरज वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि एम्स रायपूर येथील विद्यार्थी या कामामध्ये विशेष मदत करत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील नितीन धुर्वे हा विद्यार्थी अनेक कामाचं समायोजन करतोय आणि सोबतच आपल्या मित्नांच्या मदतीने ही माहिती गोंडी आणि कोरकू या आदिवासी भाषेत भाषांतर करतोय. या कामामध्ये मदत करणारे सर्व स्वयंसेवक स्वत:चं काम, दवाखाना, व्यवसाय, अभ्यास, सांभाळून आपलं समजून हे काम करत आहेत.
****
ग्रामीण आणि आदिवासी भागात स्वयंसेवी संस्थांचे दवाखाने आहेत. सरकारचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रु ग्णालयं आहेत. तेथे रुग्णसंख्या बरीच असते. ग्रामीण भागातील लोक त्यांच्या लहान मोठय़ा आजारांसाठी या दवाखान्यावरच अवलंबून असतात. परंतु तेथील काम करणारे कर्मचारी यांच्याकडे कोरोनापासून स्वत:च्या बचावाकरता कोणतीही ठोस साधनं नाहीत. मग आम्ही काही निवडक रुग्णालयांकडून त्यांना लागणा:या किट्स व एन-95 मास्कची माहिती मागवली व आपापसातील संपर्काद्वारे या गोष्टी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. डॉक्टर्स फॉर यू या कामात आम्हाला मदत करत आहेत. सोबतच यासाठी आर्थिक निधी छोटय़ा छोटय़ा देणगी स्वरूपात लोकांकडून गोळा करणं सुरू केलं. सध्या याद्वारे ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणार:या संस्थांना मदत करण्याचं ठरलं. आर्थिक निधी आणखी जमा झाल्यास अधिक ठिकाणीसुद्धा मदत करता येईल. सोबतच सरकारकडे याचा पाठपुरावा करण्यासाठी दुसरी एक टीम यासाठी प्रयत्न करतेय. माङयासह डॉ. निधीन व इतर सहकारीही त्याचा पाठपुरावा करत आहेत.
****
स्थानिकांना रेशन पुरवणं याकामी अग्नी या ग्रुपने आम्हाला मदत करायला सुरुवात केली आहे. डॉ. श्रीनिधी, डॉ. सावित्नी आणि डॉ. ऋतू हे या कामकडे लक्ष देत आहेत. सोबतच आता तर भारतभर अन्न वितरण हे काम करणा:या या संस्थांची राज्यनिहाय माहिती युमेत्ताच्या वेबसाइटवर टाकण्यात येईल. येत्या काही दिवसात वैद्यकीय कर्मचा:यांवर कामाचा आणि मानसिक तणावाच्या बोज वाढणार आहे. भीती, नैराश्य, संशय, अतिश्रम, अस्वस्थता, इत्यादी गोष्टी वाढतील. त्यामुळे वैद्यकीय कर्मचा:यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी समर्पित हेल्पलाइन सुरू करण्याची प्रक्रि या पूर्णत्वास येत आहे. या कामामध्ये विभा, रश्मी, संतोष, दीक्षा, राहुल, किरण, विवेक, हर्षल, नीलेश आदी मनोचिकित्सकांचा सहभाग आहे.

अधिक माहिती आणि संपर्कासाठी ही वेबसाइट पहा www.yumetta.org/covid-19/

Leave a Reply

19 + 19 =