You are currently viewing मनीषा वारांगडे – घाग

मनीषा वारांगडे – घाग

मनीषा वारांगडे – घाग  (गाव – वेहेल पाडा, ता – विक्रमगड, जि – पालघर , महाराष्ट्र – भारत)

नमस्कार !

मित्रांनो आधी बोलणं झाल्या प्रमाणे वेहेलपाडा येथे कामाची प्राथमिक सुरुवात झालेली आहे. मुलांना एकत्रित करून गाणी, गोष्टी, खेळ या माध्यमातून अभ्यासाची आवड निर्माण करणे या प्राथमिक हेतूने आपण कामाला सुरुवात केलेली आहे. कामाचा हेतू लक्ष्यात घेऊन युमेता फौंडेशनने (मासिक 5000) आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन पूर्तता केलेली आहे.

आपल्या कार्यशाळा-कम-अंगणवाडीच सुशोभीकरणाचं काम सुरु आहे. सध्या मुले आपल्या इथे सुरुवात झाली आहे. परंतु आम्ही मात्र एक, दोन दिवसा आड पाड्यावरच्या समाज मंदिरामध्ये जातो. तिथेच गाणी, खेळ,रंजक गोष्टी द्वारे कामाची सुरुवात झाली आहे. त्यापैकी काही मुले आपल्या कार्यशाळेत येत असतात. पाड्यावरच्या अशा सेविका, गावातील मंडळीं, किशोर वयीन मुले, मुली शाळेतील शिक्षक यांच्या भेटी नियमित चालू आहेत.

रहटीपाडा,कुवरपाडा,वेहेलपाडा, केगवा अश्या पाड्या वरच्या मुलांसाठी वेहेलपाडा गावठाण मध्ये , समाज मंदिर मध्ये चालत असलेली एकच बालवाडी आहे. वेहेलपाडा सोडला तर इतर सर्वांसाठी ही बालवाडी लांब असल्याने मुले जाण्याचे टाळतात. म्हणून आपण सुरु केलेल्या खेळणी घर,खेळणी शाळ कम अंगणवाडीत मुले यावीत असा प्रयत्न आहे. परंतु आपल्याकडे ही मुले फारशी येत नसल्याने आम्हीच मुलांच्या पाड्यावर जाऊन खेळ,गाणी,घेऊन काम सुरु केले आहे. त्याचा परिणाम म्हणून काही मुले येण्यास सुरुवात झाली आहे.

खेळणी आणी खाऊ च्या प्रयोगाला नुकतीच सुरुवात झाली आहे त्याचा परिणाम काही दिवसात दिसेल अशी आशा आहे.

Leave a Reply

3 × 1 =